Home अकोले राजूरमध्ये करोना रुग्ण तर जिल्ह्यात आज १०५ करोना मुक्त

राजूरमध्ये करोना रुग्ण तर जिल्ह्यात आज १०५ करोना मुक्त

Coronavirus Rajur Corona positive

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यातील राजूरमध्ये एक ६० वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला गेली सहा दिवसांपासून किडनीच्या उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल होती. उपचारा दरम्यान तिची करोना तपासणी करण्यात आली असता तिचा अहवाल काल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे दिलासादायक वृत्त हाती आले आहे. जिल्ह्यात आज १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या १०२५ झाली आहे.

यामध्ये श्रीरामपूर येथील २२, श्रीगोंदा २, संगमनेर ६, राहुरी १, भिंगार ६, पाथर्डी ६, राहता ८, पारनेर १०, नेवासा ३, नगर ग्रामीण ३, नगर शहर ३८ यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक समाधानाची बाब वाटत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Rajur Corona positive Ahmednagar 105 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here