Home अहमदनगर अहमदनगरमध्ये आज १८ करोनाबाधित, संगमनेर खुर्द येथे एक  

अहमदनगरमध्ये आज १८ करोनाबाधित, संगमनेर खुर्द येथे एक  

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज १८ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी दुपारी १८ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

यामध्ये नगर महापालिका भागातील सहा, भिंगार सात, संगमनेर एक, शेवगाव एक, पारनेर दोन, रहाता येथील एक येथील रुग्णांचा समावेश आहे.

पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे एक रुग्ण आढळून आला आहे. राहता तालुक्यातील पाथरे येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक करोना बाधित आढळून आली आहे. एका तेरा वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १९५ झाली आहे. 

नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे तीन, टी.व्ही. सेंटर एक, फकीरवाडा एक,पाईपलाईन रोड एक रुग्ण आढळून आले आहेत. भिंगार येथील गवळीवाडा येथे सात रुग्ण आढळून आले आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronvirus Ahmednagar Sangamner corona update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here