Home क्राईम जन्मलेल्या मुलीचा पित्यानेच डोक्यात दगड घालून केला खून

जन्मलेल्या मुलीचा पित्यानेच डोक्यात दगड घालून केला खून

नेवासा: नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तीन दिवसांपूर्वी जन्मलेली मुलीचा पित्यानेच डोक्यात दगड घालून घात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.

याबाबत मुलीची आई प्रिया अजय काळे वय २० यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून अजय मिरीलाल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक ७ जुलै मंगळवारी प्रिया काळे यांना मुलगी झाली. तेव्हापासून पती अजय काळे प्रियाला मारहाण करीत असे. घरच्यांनी त्याला समजावून सांगितले मात्र तरीही त्याने  बुधवारी रात्री मारहाण केली व घरातून निघून गेला. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान पुन्हा तो घरी आला. त्यावेळी सासू, नणंद, दीर घरी होते. त्यावेळी पुन्हा प्रियाला मारहाण करी लागला. त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितले मात्र त्याने शिवीगाळ करत मुलीच्या डोक्यात दगड घातला.

उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी जाताच आरोपी घराशेजारील उसाच्या शेतात्त पळाला. पोलिसांनी त्याचा उसात शोध घेऊन चार तासानंतर दुपारी तीन वाजता त्याला पकडण्यात यश आले.    

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Nevasa girl’s father killed her by throwing a stone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here