Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात करोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही

अहमदनगर जिल्ह्यात करोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही

Covid Vaccination No Vaccine No Ration in Ahmednagar

अहमदनगर | Covid Vaccination: करोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी अनेक जिल्ह्यांत लस न घेतलेल्या नागरिकांच्या विविध सुविधा बंद करण्यात येत आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातही असाच निर्णय झाला आहे. लस न घेतलेल्यांना पेट्रोल, रेशन व अन्य सुविधा देणे तात्काळ रद्द करण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही, त्या ग्रामस्थांची गावे त्यांच्या गावात जाहीर केली जाणार आहेत.

कोरोना काळातील दुसऱ्या लाटेत राज्याची डोकेदुखी वाढविलेल्या नगर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. ओमिक्रॉमचे संकट डोक्यावर असतानाही लसीकरणाचा वेग वाढत नसल्यामुळे आता प्रशासनाने पावले उचलत कडक निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली करोना उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली.

मुश्रीफ म्हणाले की नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ लाख लोकांनी एकही डोस घेतला नाही. पाच लाख लोकांनी पहिला डोस घेतला, पण अजून दुसरा डोस घेतला नाही. ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांच्या काही नागरी सुविधा बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये पेट्रोल असो अथवा रेशन व अन्य सुविधा तात्काळ बंद कराव्यात अशा प्रकारचे निर्देश येथील प्रशासनाला दिले आहेत. एकही डोस न घेणाऱ्या व्यक्तींची नावे त्याच्या गावांमध्येही जाहीर करावीत अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Covid Vaccination No Vaccine No Ration in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here