Home अहमदनगर धक्कादायक: बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

धक्कादायक: बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

Crime News Mobile photo of a woman taking a bath in the bathroom in Ahmednagar 

अहमदनगर | Ahmednagar | Crime News : बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे एकाने मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचे तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल (Crime)करण्यात आला आहे. मतीन हुसेन शेख (रा. आंबेडकर चौक, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आमच्या घराच्या बाजूला बाथरूममध्ये अंघोळ करत असताना मतीन शेख याने त्याच्या मोबाईलमध्ये बाथरूमच्या दरवाजाच्या मोकळ्या जागेतून चित्रीकरण करून गैरवर्तन केले.

चित्रीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच मोबाईल पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मतीन शेख शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडला असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे.

Web Title: Crime News Mobile photo of a woman taking a bath in the bathroom in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here