Home अहमदनगर Crime: महिला पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की

Crime: महिला पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की

Shrigonda Crime: खोटी तक्रार मी पोलीस अधीक्षकांना तुमच्या विरुद्ध देऊन तुम्हाला कामाला लावते.

Crime Abusing and punching women policemen

श्रीगोंदे:  बेलवंडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांशी हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोळगाव येथील दोन महिलांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बेलवंडी पोलिस स्टेशनला आलेली महिला वंदना भापकर एकमेकांविरुद्ध बडबड करत असताना पोलिसांना शिवीगाळ करू लागली. तेव्हा पोलिस नाईक सुरेखा वलवे यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु वंदना प्रदीप भापकर आणि मंगल नारायण भापकर, रा. कोळगाव या दोन्ही महिलांनी पोलिस नाईक सुरेखा वलवे व पोलिस नाईक शोभा काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सरकारी कामात अडथळा करून सरकारी कामात अडथळा आणला. माझा नवरा सीआरपीएफमध्ये आहे. मी तुमच्या विरुद्ध तक्रारी देऊन तुमच्या नोकऱ्या घालवीन, असे म्हणून महिला पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. माझ्या गळ्यातील सोने पैसे व मोबाईल काढून घेतले, अशी खोटी तक्रार मी पोलीस अधीक्षकांना तुमच्या विरुद्ध देऊन तुम्हाला कामाला लावते. असे म्हणून त्या महिला निघून गेल्या असे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास पीएसआय चाटे हे करीत आहे.

Web Title: Crime Abusing and punching women policemen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here