Home संगमनेर संगमनेरात घरातून पान मसाला गुटखा जप्त, पोलिसांची कारवाई

संगमनेरात घरातून पान मसाला गुटखा जप्त, पोलिसांची कारवाई

Sangamner Crime | Police Raid: रस्त्यावरील एका दुकानाच्या पाठीमागील घरातून प्रतिबंधित पान मसाला गुटखा जप्त.

Pan masala gutkha seized from the house, police Raid

संगमनेर: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत ३१ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला गुटखा जप्त केला. मंगळवारी (दि. १२) दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावरील एका घरात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण शिवाजी काठे, तषार सुधाकर पवार (रा. कोल्हेवाडी रस्ता, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची। नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या विशेष पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हेवाडी रस्त्यावरील एका दुकानाच्या पाठीमागील घरातून प्रतिबंधित पान मसाला गुटखा जप्त करण्यात आला.

Web Title: Pan masala gutkha seized from the house, police Raid

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here