Home अहमदनगर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Shevgaon : Sexually abuse on women, ५ ते ६ दिवस शारीरिक संबंध ठेवले, लग्न करण्यास नकार दिला तसेच सदर घटनेची कोठे तक्रार केल्यास तुझ्या कुटुंबास जीवे मारून टाकीन, अशी धमकी.

Sexually abuse of women by showing the lure of marriage

शेवगाव: तालुक्यातील एका गावातील एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून मुसा हाजी शेख (वय ५५) याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिलेने शेवगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथील लग्न जुळविणारा समशेर रज्जाक पटेल, या मध्यस्थी व्यक्तीमार्फत औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज पंढरपूर येथील मुसा हाजी शेख (वय ५५) हे माझ्या घरी आले व मला लग्नाचे वचन व आमिष दाखवून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज-पंढरपूर येथे त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेले. तेथे मुसा हाजी शेख याने माझ्यासोबत ५ ते ६ दिवस शारीरिक संबंध ठेवले, माझ्यासोबत लग्न कधी करणार ? असे मी त्यास विचारले असता, शेख याने माझ्यासोबत  लग्न करण्यास नकार दिला तसेच सदर घटनेची कोठे तक्रार केल्यास तुझ्या कुटुंबास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच समशेर रज्जाक पटेल याच्यासोबत मला माझ्या गावी आणून सोडले. मी घरी आल्यानंतर मुसा हाजी शेख यास अनेक वेळा फोन करून लग्नाबाबत विचारले असता, त्याने मला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याचा मोबाईल बंद करून टाकला.

शेख याने आपली फसवणूक केल्याचे माझ्या लक्षात आले. सदर फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी मुसा हाजी शेख व लग्न जुळविणारा मध्यस्थी समशेर रज्जाक पटेल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अधिनियम कलम ३७६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

Web Title: Sexually abuse of women by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here