Home अहमदनगर किरकोळ कारणातून महिलेस मारहाण व विनयभंग

किरकोळ कारणातून महिलेस मारहाण व विनयभंग

Crime News Beating and molestation of women

अहमदनगर | Crime News: नगर शहरात एका महिलेने येथे गाडी लावू नकोस असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून  महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालीद बाबर सय्यद (वय 25 रा. झेंडीगेट, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. फिर्यादी महिला त्यांच्या वडिलांना जेवण घेऊन गेल्या असतान सय्यद हा तेथे त्याची गाडी लावत होता. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाल्या, माझ्या वडिलांचे वय जास्त झाले आहे, त्यांना चालता येत नाही, तू येथे गाडी लावू नकोस. असे सांगताच सय्यद याला त्यांचा राग आल्याने त्याने  फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला आहे. फिर्यादीचा भाऊ भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील सय्यद याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Beating and molestation of women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here