तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला, पळून जाण्याची धमकी देत असल्याची तक्रार
Vardha Murder Case: अल्पवयीन तरुणीचा मृतदेह (Dead body) विहिरीत आढळला.
वर्धा: जिल्ह्यातील तळेगाव टालाटूले येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले झाले होते. याप्रकरणी मयत पावलेल्या तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत पावलेली तरुणी वायगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या तरुणीसोबत गोपाळ नावाचा युवक बोलण्याचा आग्रह धरायचा. परंतु, तरुणीने नकार दिल्यावर मोबाईलवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत आईला सांगितल्यावर त्या युवकाला समजावण्याचा प्रयत्नही केला.
मात्र, ३१ ऑगस्ट रोजी गोपालने तरुणीच्या काकाला पुतणीसोबत लग्न लावून देण्याबाबत सांगितलं. लग्न जुळवून नाही दिले पुतणीला पळवून नेईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर ३१ ऑगस्टला सायंकाळी तरुणी घराबोहेर गेली पण घरी परतलीच नाही. त्यानंतर या तरुणीचा मृतदेह २ सप्टेंबरला विहिरीत आढळला. या धक्कादायक घटनेबाबत तरुणीच्या आईला कळताच गोपाल विरोधात हत्येची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गोपाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळं जिल्हा सामान्य रुग्णालयात बराच वेळ वातावरण तणावपूर्ण होतं.जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती.
Web Title: Dead Body of young woman found in well