Home अहमदनगर अहमदनगर: डीजेच्या आवाजाने शिक्षकाचा मृत्यू

अहमदनगर: डीजेच्या आवाजाने शिक्षकाचा मृत्यू

Ahmednagar News: श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या आवाजाने मृत्यू (Death) झाल्याची घटना.

death of a teacher with the sound of a DJ

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या आवाजाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  डीजेच्या आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर शनिवारी (दि. ६) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे ( वय ५८) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे (ता. कर्जत) येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

अपघातात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू (Accident)

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील औटीवाडीजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी घडली. अणर्व संदीप आढाव (वय ५, रा. धानोरा, ता. जामखेड) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाचे वडील संदीप आढाव यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक अशोक बाबा दातीर (रा. औटेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: death of a teacher with the sound of a DJ

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here