Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात आठ दिवसात सहा मुली गायब

अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात आठ दिवसात सहा मुली गायब

Ahmednagar News: राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून मुली पळवून नेणे किंवा पळून (abduction ) जाण्याच्या सहा घटना समोर आल्या आहेत.

Six girls abduction in eight days in Rahuri taluka in Ahmednagar

राहुरी | Rahuri : राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून मुली पळवून नेणे किंवा पळून जाण्याच्या सहा घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये अल्पवयीनपासून ४२ वर्षीय महिलांचा समावेश आहे. या घटनांमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील सोनगाव, गुहा, केंदळ, टाकळीमियाँ, वळण तसेच राहुरी शहर या भागात मुलींना पळवून नेल्याच्या आणि पळून जाण्याच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमुळे पालकवर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

राहुरी शहर हद्दीत पुन्हा एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या आहे. राहत्या घरातून अपहरण केल्याची गेल्या घटना दि. ४ मे रोजी रात्रीच्या दरम्यान उघडकीस आली. राहुरी शहर हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहत आहे. ती मुलगी व तिचे घरातील लोक जेवण करून झोपले होते. रात्री १२:३० च्या सुमारास त्या मुलीचे वडील लघुशंकेसाठी उठले असता ती मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसून आले. त्या मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Six girls abduction in eight days in Rahuri taluka in Ahmednagar

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here