Home संगमनेर संगमनेर: ठिबक सिंचनचे पाइप चोरी, दोघांना अटक

संगमनेर: ठिबक सिंचनचे पाइप चोरी, दोघांना अटक

Sangamner News: ठिबक सिंचनचे पाइप चोरणाऱ्या दोघांना अटक (Arrested).

Drip irrigation pipe theft, two arrested

संगमनेर : शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाइप चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अखेर संगमनेर पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.  संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलिस पथकाने तपास करत ठिबक सिंचनचे पाइप चोरणाऱ्या दोघांना पकडले.

फरदीन इसाक शेख, नवशाद इसाक शेख (दोघेही रा. अकोले नाका, संगमनेर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस तपासात त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात संगमनेर आणि अकोले तालुक्यांतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. २८ ऑगस्टला रात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे शेतातील घरासमोरून तीन-चार चोरटे ठिबक सिंचनचे पाइप पीकअप या चारचाकी वाहनात टाकून चोरून नेत होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केल्याने चोरटे वाहन सोडून पळून गेले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संगमनेर पोलीस पथकाने तपास करीत दोघांना पकडले आहे.

Web Title: Drip irrigation pipe theft, two arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here