अहमदनगर: विजेचा शॉक बसून माजी उपसरपंचाचा मृत्यू
Ahmednagar News: ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचा विद्युत प्रवाहाचा शॉक (Electric Shock) बसून मृत्यू झाल्याची घटना. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय बाबासाहेब माने (वय ३३) यांचा विद्युत प्रवाहाचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नदीला पाणी आल्याने शेतातील इलेक्ट्रिक मोटार चालू करायला गेलेल्या बाबासाहेब माने यांना वायरमधून आलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसला. वायर खाली पाण्यात पडलेली होती व ती एका जागी तुटलेली होती. माने यांना ती दिसली नाही. पायातील बूट काढून पाण्यातून जात असताना अचानक त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Web Title: Former Deputy Sarpanch dies of electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App