Home अकोले अकोले: मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, पाठींबा देणाऱ्यांनीही तीच भूमिका...

अकोले: मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, पाठींबा देणाऱ्यांनीही तीच भूमिका घ्यावी  

Akole News | Maratha Kranti Morcha: मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारला.

Maratha Kranti Morcha Chief Minister and Deputy Chief Minister should resign

अकोले: जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्या व त्यांना पाठींबा देणार्‍यांनीही तशी भुमिका घ्यावी केवळ घटनेचा निषेध करु नका, असा टोला आ. डॉ. लहामटे यांचे नाव न घेता डॉ. अजित नवले यांनी त्यांना लगावला.

जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारला होता. अत्यावश्यक सेवा वगळता शहर व परिसरातील व्यापार्‍यांनी या बंदमध्ये कडकडीत सहभाग नोंदविला. बंदला सर्वांचा चांगला प्रतिसाद नोंदविला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. शाळा, महाविद्यालये यांनीही विद्यार्थ्यांना सुट्टी देत बंदला पाठींबा दिला. बस स्थानक परिसरातून घोषणा देत आंदोलकांनी दोन वाजता तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसील आवारातच निषेध सभा घेतली.

आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलनावर पोलिस दलाचा वापर करणे चुकीचे आहे. सरकारने सरकारची बाजू मांडणे आवश्यक होते. झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी सरकारने घेऊन चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. घटनेत पोलिसांना आदेश देणार्‍याचा शोध घेऊन तातडीने त्याच्यावर कारवाई करावी किंवा यात कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता सहभागी असेल तर त्याने तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. डॉ. लहामटे यांनी केली.

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी जालन्यातील घटनेत लहान मुले, महिलांना सुद्धा पोलिसांनी मारहाण केली. अशा निर्दयी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ म्हणाले, मराठा समाजाचे प्रश्नासाठी मी सदैव रस्त्यावर उतरून आंदोलने करायला तयार आहे. कुणीही उठायचे आणि आमच्या मराठ्याचे आंगावर यायचे. मराठा समाजाचे आरक्षण राजकारणाच्या आखाड्याने घालवले. सर्वच पक्षांनी मराठ्याचा फक्त राजकारणासाठी फायदा घेतला. पक्ष म्हणून नाही फक्त जात म्हणून एकत्र या. आरक्षण मिळाले नाही तर आमदार, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भुमिका घ्या. आरक्षण मिळण्यासाठी क्रांती घडवावी लागेल. मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री मराठा आहे. त्यांनी कालच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी धुमाळ यांनी केली.

निवासी नायब तहसीलदार मुळे यांनी निवेदन स्विकारले. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Maratha Kranti Morcha Chief Minister and Deputy Chief Minister should resign

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here