Koaprgaon News | शेतातील शेततळ्यात किती पाणी आले आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा पाय घसरून तळ्यात पडून त्यांचा त्यांचा मृत्यू (dies).
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी नारायण पुंडलिक मोरे (वय- ६०) हे आपल्या शेतातील शेततळ्यात किती पाणी आले आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा पाय घसरून तळ्यात पडून त्यांचा त्यांचा मृत्यू झाला असल्याची खबर सोमनाथ तात्याबा मोरे यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी व खबर देणार शेतकरी सोमनाथ मोरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली की, नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी नारायण मोरे हे आपल्या शेतातील तळ्यात किती पाणी आले आहे हे पाहण्यासाठी तळ्यावर दि. १० जुलै रोजी सायंकाळी ०६ ते ०७.३० वाजेच्या सुमारास गेले असता ते घरी आले नाही. त्यामुळे घरातील नातेवाईक ते का आले नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मयत शेतकरी संबंधित तळ्यात पडलेले आढळले होते. आरडाओरडा करून नजीकच्या शेतकऱ्यांची मदत घेऊन त्यांना तातडीने बाहेर काढले व उपचारार्थ त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणी फिर्यादी इसम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या बाबत खबर दिली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे यांनी भेट दिली.
Web Title: Farmer dies after falling into a field