Home Accident News Accident: ट्रॅव्हल्स व ट्रक मध्ये भीषण अपघात, दोन ठार

Accident: ट्रॅव्हल्स व ट्रक मध्ये भीषण अपघात, दोन ठार

Bhandara Accident: अपघातात चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू.

Tragic accident in travels and trucks, two killed

भंडारा: ट्रॅव्हल्सने नादुरस्त उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मोहघाट जंगल परिसरात गुरुवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथून प्रवाशांना घेऊन हंसा ट्रॅव्हल्स नागपूरला निघाली होती. भंडारा साकोली महामार्ग क्रमांक 6 मोहघाट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला.

या घटनेत ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रॅव्हल्समधील अन्य प्रवाशी सुद्धा जखमी झाले. जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Tragic accident in travels and trucks, two killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here