Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

Forecast of untimely rain in Ahmednagar 

अहमदनगर: तापमान वाढत आहे. त्यात आता अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. (Forecast of untimely rain in Ahmednagar )

नगर जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी पाउस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी अवकाळी पाउस व गारपीट झाली होती. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या कोरोना महामारी सुरु आहे. सर्वच हैराण झालेले असताना आता पुन्हा हे संकट उभे राहिले आहे.

मध्य महाराष्ट्रात चक्रीय वादळाची स्थिती निर्माण झाली असून पूर्व मोसमी पावसासाठी वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात रविवारी मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी पाऊस झाला. मंगळवारी अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा, सोलापूर, मराठवाडा तसेच बुधवारी अहमदनगर पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सांगली, सोलापूर, मराठवाडा या भागांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

Web Title: Forecast of untimely rain in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here