Home क्राईम संगमनेर तालुक्यात तरुणाचा चाकूचा वार करून निर्घुण हत्या

संगमनेर तालुक्यात तरुणाचा चाकूचा वार करून निर्घुण हत्या

Young man murder in Sangamner Taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारात अज्ञात कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाचा दोन अज्ञात युवकांनी चाकूचे वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अरविंद शिंदे वय २८ रा. मोठेबाबामळा सायखिंडी असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील अरविंद शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९.२५ वाजेच्या सुमारास मोठेबाबामळा वस्तीवर सचिन यास दोन तरुण मोटारसायकलवरून आले. त्याला बोलावून त्यास मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले. सायखिंडी शिवारात सोमनाथ पारधी यांच्या शेतात सचिन याच्यावर धारदार चाकूने मानेवर व डोक्यावर वार करून हत्या केली. या घटनेची माहिती कामगार पोलीस पाटलाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी या घटनेची कसून चौकशी करीत आहे. अज्ञात तरुंणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस. सानप हे करीत आहे.      

Web Title: Young man murder in Sangamner Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here