Home पुणे Gang Rape | धक्कादायक! नातेवाइकांच्या घरी गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार

Gang Rape | धक्कादायक! नातेवाइकांच्या घरी गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार

Gang rape of a girl who went to a relative's house

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड  पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाइकांच्या घरी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली. १८ वर्षांचा तरूण आणि एका २१ वर्षांच्या रिक्षाचालकानं १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. लक्ष्मण क्षीरसागर (वय १८) आणि रोहित सुतार (वय २१) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. यातील रोहित हा रिक्षाचालक आहे. या दोघांविरोधात पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित मुलगी आपल्या नातेवाइकांच्या घरी एकटीच होती. त्यावेळी संशयित आरोपी लक्ष्मण क्षीरसागरने पीडितेला तेथून बळजबरीने उचलून आपल्या घरी नेले. घरातील खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर लक्ष्मणचा मित्र रोहित यानेही तिच्यावर बलात्कार केले. घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकावले. कोठे काही सांगितले तर , तुझ्या कुटुंबातील सर्वांना संपवून टाकू,  अशी आरोपींनी तिला धमकी दिली. या घटनेने हादरलेल्या पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर नातेवाइकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. आरोपी लक्ष्मण आणि रोहित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संशयित आरोपी लक्ष्मण आणि रोहित या दोघांना अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Gang rape of a girl who went to a relative’s house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here