Home अकोले शासनाने राज्यातील मंदिरे उघडून सर्वांना न्याय द्यावा अन्यथा घंटानाद आंदोलन: ह.भ.प. अरुण...

शासनाने राज्यातील मंदिरे उघडून सर्वांना न्याय द्यावा अन्यथा घंटानाद आंदोलन: ह.भ.प. अरुण महाराज चौधरी

government should open temples in the state and give justice to all, otherwise the bell

अकोले प्रतिनिधी:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास चांगल्या पैकी  शासनास यश आले आहे, गरीब भिक्षुक,कीर्तनकार व हार फुले प्रसाद विक्रेते यांची उपासमार टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर  मंदीर उघडण्यात यावे.

कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह,प्रवचन सुरू करण्यास परवानगी द्यावी,  या दृष्टीने हिंदू रक्षक धर्म परिषदेने अनेक वेळा ऑनलाईन निवेदन दिलेली आहेत तरी राज्य शासनाने तातडी याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा अन्यथा घंटा नाद,रस्ता रोको आंदोलन, आत्मक्लेश आंदोलन या सारखे आंदोलने करण्यात येतील, असा इशारा हिंदू रक्षक धर्म परिषदेचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. अरुण महाराज चौधरी यांनी दिला आहे.

आज तहसीलदार अकोले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजमितीला ५ ते ६ महिन्याच्या लॉकडाऊन मुळे सर्व सामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.मंदिरे बंद असल्याने प्रसादालये ही बंद आहेत.त्यामुळे गरीब भिक्षुकांचे अन्नावाचून हाल होत आहे .मंदिराजवळ असलेल्या फुलहार, प्रसाद विक्रेते व्यावसायिकाचा रोजी रोटीचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. कीर्तनकार मंडळींची कीर्तन सेवा बंद असल्याने त्यांनाही फारच बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सर्वांवरच उपासमारीची वेळ आली असून लाईटबील, घरपट्टी,पाणी पट्टी भरणे ही अवघड झाले आहे.

त्यामुळे शासनाने राज्यातील मंदिरे उघडून या सर्वांना न्याय द्यावा अन्यथा उद्या पासून घंटानाद आंदोलन,दि.२३ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करणार असून जर मंदिर उघडले नाही तर नाईलाजास्तव दि २९ ऑक्टोबर पासून श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू करणार आहोत व त्याच ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत महंतांच्या किर्तनाने किर्तन सेवा सुरू करणार आहोत. तरी शासनाने सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटींवर  सर्व धार्मिक मंदिरे सुरू करणे,कीर्तन,अखंड हरिनाम सप्ताह,प्रवचन सुरू करण्यास परवानगी देऊन वारकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी हिंदू रक्षक धर्म परिषदेने केली आहे.

यावेळी हिंदू  रक्षक धर्म परिषदेचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.अरुण महाराज चौधरी,गोरक्षक सेवा समितीचे ह.भ.प.सोमनाथ महाराज चौधरी ,विभाग प्रमुख ह भ प करू महाराज शेळके, बजरंग शक्ती सेवाचे विभागप्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज घुले,विभाग प्रमुख हभप बाळासाहेब महाराज डोंगरे,गाव प्रमुख ह भ प शांताराम महाराज भोर,कायदेविषयक सल्लागार वकील भाऊसाहेब गोडसे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: government should open temples in the state and give justice to all, otherwise the bell

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here