अकोले: वेतनासाठी ग्रामसेवकाचा अकोले प.स. समोर ठिय्या आंदोलन
अकोले: वेतनासाठी ग्रामसेवकाचा अकोले प.स. समोर ठिय्या आंदोलन
अकोले: तालुक्यातील ग्रामसेवकांचे वेतन अदा न केल्याने अकोल्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
अकोले तालुक्यातील ग्रामसेवकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप अदा करण्यात आले नाही, ग्रामसेवक जेजुरकर यांचे आकस बुद्धीने निलंबन केले. ग्रामसेवकांना ‘ड’ यातील सर्वेक्षण देताना मूळ गाव न देता शेजारील गावासाठी १५ दिवस स्वतंत्र आदेश देणे व सदर कामात मुदतवाढ मिळावी, ग्रामसेवक युनियन अकोले संघटना कामाकरिता स्वतंत्र कार्यालय मिळावे, ग्रामसेवकांना अतिरिक्त कार्यभार देताना ग्रामसेवकांना ग्रामसेवकांचे सजे व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी यांचे सजे देवून अतिरिक्त मेहनताना देणेबाबत कार्यवाही करावी , या व अन्य मागण्यांसाठी अकोल्यातील सर्व ग्रामसेवक युनियन , ग्रामसेवक संघ या संघटनांच्या पदाधिकार्यांनी त्यास पाठींबा दिला. यामध्ये एकनाथ ढाकणे, वाळीबा मुंढे, संतोष देशमुख, ज्योती मालवे, लक्ष्मी डगळे, ज्योती राहणे, उजवला अरगडे , रवींद्र ताजने, सुभाष मुले, मच्छिंद्र काकडे, सोमनाथ गभाले, तुकाराम भांगरे आदींचा समावेश होता.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा