Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या भागात जोरदार पाऊस, गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान

अहमदनगर जिल्ह्यात या भागात जोरदार पाऊस, गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान

Ahmednagar News: Heavy rain मेघगर्जना, विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह चार वाजता जोरदार पाऊस झाला. सलग दोन तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

Heavy rain and hail caused huge damage in this area

शेवगाव: शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातकुडगावसह भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, गुंफा परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय भेंडासह (ता. नेवासा) परिसरात दोन तास जोरदार पाऊस झाला.

नेवासा तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी दुपारी मेघगर्जना, विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह चार वाजता जोरदार पाऊस झाला. सलग दोन तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

भातकुडगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला. गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला. गारपीट झाल्याने कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काही भागात तर कांद्याला पातच राहिली नाही. तसेच गहू फळबागांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून मागील वर्षीची अतिवृष्टीची नुकसानभरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच आता नवीन संकट उभे राहिले आहे. तसेच ढोरजळगाव परिसरातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला. कांदा व गहू पिकांचे येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

भेंडा बटुक, चांदा, देवगाव, देडगाव, अंतरवाली, कौठा, कुकाण्यासह परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. तयार झालेले गहू काढून ठेवलेले कांदे भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणातील उष्मा व उकाडा वाढला आहे. त्यातच शुक्रवारी दुपारनंतर अचानक जोरदार वायासह विजेचा कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शेतकयांची दैना उडाली. शहरटाकळी येथील दत्तवस्तीवरील एका नारळाच्या झाडावर, तर भावीनिमगाव येथील चेडे वस्ती येथील एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. भावीनिमगाव व परिसरात विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसर काळोखात बुडाला होता. रात्री उशिरापर्यंत या भागात वीजपुरवठा खंडित होता. भातकुडगाव परिसरात गारपिटीने कांद्याचे झालेले नुकसान. तसेच काढून टाकलेल्या कांद्यांच्या वाफ्यात पाणी साचले.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकयांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन भरपाईचा विचार शासनाकडून झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. मजलेशहर, शहरटाकळी, भावीनिमगाव, हिंगणगाव, डोरसडे, दहिगाव-ने, दहिफळ, बोडखे, ताजनापूर परिसरातही जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नारळाच्या झाडांवर वीज कोसळून झाडे पेटली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक बंद झाली. बक्तरपूर फाटा रस्त्यावरही ठिकठिकाणी झाडे उन्मळली.

Web Title: Heavy rain and hail caused huge damage in this area

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here