Home अकोले भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Heavy rains receded in the catchment area

भंडारदरा: नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ मंदावला आहे. त्यामुळे परिसरात व लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भंडारदरात गत 24 तासांत अवघे 20 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 2438 दलघफू (22.09 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पाणलोटात मान्सून दाखल झाला. तेव्हापासून पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामुळे बारा दिवसांत धरणात नव्याने 183 दलघफू पाणी दाखल झाले आहे. पाऊस कमी झाल्याने डोंगरदर्‍यातून वाहणारे धबधबेही गायब होऊ लागले आहेत. खळखळणारे ओढेनालेही कोरडे दिसत आहेत. काल भंडारदरात दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 5 मिमी झाली आहे. जून महिन्यात समाधानकारक पाउस हा तालुक्यात पडलेला नाही त्यामुळे नागरिकांमधून नाराजी उमटत आहे. 

Web Title: Heavy rains receded in the catchment area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here