Home महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन वाढणार का यावर जयंत पाटील यांनी सांगितले की:

राज्यात लॉकडाऊन वाढणार का यावर जयंत पाटील यांनी सांगितले की:

Jayant Patil asked whether the lockdown will increase 

Maharashtra LockDown: राज्यात १४ एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये २२ तारखेला काही बदल करण्यात आले. जिल्हा बंदी, राज्याबंदी, लोकल. बस सेवा सर्व सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. १ मे पर्यंत ही नियमावली जारी राहणार आहे.  

जयंत पाटील यांना १ मे नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असून ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोविड सेंटर उभारणीसाठी नर्सिंग स्टाफ मिळत नाही. त्यामुळे राज्यात १ मे नंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. सरकारने १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केलेला आहे. मात्र यापुढेही लॉकडाऊन वाढवणार असल्याचं अनेकांचे मत आहे. सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेण्यात येईल त्यामध्ये ऑक्सिजन, बेड परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे उत्तर पाटील यांनी मांडले.  

Web Title: Jayant Patil asked whether the lockdown will increase 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here