Home कोपरगाव नोकरानेच मारला घरात डल्ला, नोकरास अटक

नोकरानेच मारला घरात डल्ला, नोकरास अटक

Koparagaon helper get theft 

कोपरगाव(Kopargaon): कोपरगाव शहरातील गोकुळनगरीतील भरत रंगनाथ कांबळे यांच्या बंगल्यात एक भाडेकरू म्हणून राहत आहे. त्या व्यक्तीकडे मजुरीकडे काम करणाऱ्या नोकरानेच घरातील वस्तूवर डल्ला मारत चोरी केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. बंगल्यातील २४ हजार रुपये किमतीचा एसी, टी. व्ही. इलेक्ट्रिक मोटार यांची चोरी केली आहे.  

याप्रकरणी बंगल्याचे भाडेकरू लोकेश अप्पाराम बाश्यम मूळ राहणार आंद्रप्रदेश यांच्या फिर्यादीवरून समीर उस्मान शेख रा. लक्ष्मणवाडी ता. कोपरगाव याच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याचबरोबर चोरी केलेल्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच त्याच्याकडील असणारी ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Koparagaon helper get theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here