Home नेवासा मंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन, त्यांच्या पत्नी करोना पॉझिटिव्ह

मंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन, त्यांच्या पत्नी करोना पॉझिटिव्ह

Nevasa MLA Shankarao Gadakh quarantine 

नेवासा(Nevasa): नेवासा तालुक्याचे आमदार व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीचा करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः हून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

शंकरराव गडाख यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शंकरराव गडाख यांनी होम क्वारंटाईन, राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची करोना चाचणी तातडीने करण्यात आली आहे. अशी माहिती स्वतः मंत्री शंकरराव गडाख यांनी ट्वीट करत दिली आहे. नागरिकांनी घरी रहा, सुरक्षितरहा असा सल्लाही देण्यात आला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावने राज्यात काही मंत्र्यांना व नेत्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या होम क्वारंटाईन आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Nevasa MLA Shankarao Gadakh quarantine 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here