Home कोपरगाव हळदी समारंभात दगडफेक, ११ जणांवर गुन्हा दाखल

हळदी समारंभात दगडफेक, ११ जणांवर गुन्हा दाखल

Kopargaon 11 persons charged for throwing stones at yellow ceremony

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातील टाकळी नाका बुद्धविहार परिसरात सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हळदीच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु असताना ११ जणांनी दगडफेक केली. त्यानंतर लोखंडी गजाने मारहाण करत जेवणाच्या भांड्यांची तोडफोड व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.

या दगडफेकीत एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी जखमी योगिता सुरेश थोरात यांच्या फिर्यादीवरून दिपक राजेंद्र नाईकवाडे, अमोल नरेंद्र पेकले, दशरथ मच्छिंद्र त्रिभुवन, शरद मच्छिंद्र त्रिभुवन, विशाल पिंगळे, विकी सरोदे, अजय दिलीप डावखर, आकाश रोहोखले, सचिन साळवे, साईनाथ मच्छिंद्र त्रिभुवन, गणेश बाबुराव काटे सर्व रा. कोपरगाव यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यामधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अजय डावखर आणि सचिन साळवे हे पसार झाले आहेत. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. आर. तिकोने हे करीत आहेत.

Web Title: Kopargaon 11 persons charged for throwing stones at yellow ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here