Home शेवगाव जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना शिक्षा

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना शिक्षा

Shevgaon Punishment of three accused for attempted murder

शेवगाव | Shevgaon: शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे मुलगा व त्याच्या आईवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

४ जून २०१७ रोजी योगेश बबन काळे वा त्याची आई केशरबाई यांना बांधावरील गवत कापण्याच्या कारणावरून खोऱ्याने मारहाण केली होती. याबबत योगेश काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवाजी गदडू काळे, चंदाबाई शिवाजी काळे व संभाजी शिवाजी काळे असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल. आणेकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाल दिला. दंडाच्या रकमेपैकी ७० हजार रुपये जखमींना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  या तीन आरोपींना जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Shevgaon Punishment of three accused for attempted murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here