Home कोपरगाव दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक

Kopargaon Four accused arrested in preparation for robbery

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहराजवळ असलेल्या नगर मनमाड राज्यमार्गावर कातकाडे पेट्रोल पंपासमोर रात्री बारा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे हे रात्री गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना एक संशियीत स्कॉर्पियो उभी आढळून आली. त्यांनी त्यातील व्यक्तींची चौकशी केली.

आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे रा. गोटुंबे आखाडा ता. राहुरी, सुरज लक्षमण वडमोरे वय २२ रा. आहेर वायगाव ता. बीड, राहुल कुंडलिक बुधनव वय २२ रा. खामगाव, भारत चितळकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी, स्कॉर्पियो गाडी, लोखंडी गज, दोन लोखंडी कोयते, तीन मोबाईल अशा वस्तू जप्त करण्यात आल्या.

संभाजी भीमराज शिंदे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, सहायक पोलीस उप निरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करीत आहेत.

Web Title: Kopargaon Four accused arrested in preparation for robbery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here