संगमनेर अवैध गुटका विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, १० हजार रुपयांचा गुटका जप्त
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरामध्ये मालदाड रोड येथे एका दुकानात अवैध गुटका विक्री करणाऱ्या दुकानावर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये साडे दहा हजार रुपयांचा पानमसाला गुटका पकडण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर शहरात मालदाड रोडवरील जोर्वेकर वीटभट्टीसमोर अंबर कॉलनीत असणाऱ्या अवैध गुटका विक्री होते अशी माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली.
पोलिसांनी पथकासह शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मालदाड रोड येथे येथे असणाऱ्या सार्थक ट्रेडर्स येथे छापा टाकला. त्यात अनिल ज्ञानदेव दिघे याच्या राहत्या घरात १० हजार ५५४ रुपयांचा माल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस हवालदार अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहेत.
Web Title: Sangamner raids shop selling illegal gutka
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436