संगमनेरला ऑक्सिजनचा तुटवडा: डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक चिंतेत
संगमनेर | Sangamner: नगर शहरात ऑक्सिजनचा दोन दिवसांपासून तुटवडा भासत होता. तिथे कोठूनतरी टंचाई रुळावर येताच संगमनेर तालुक्यात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंतेत पडले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात २१ हजारांच्यावर रुग्ण सध्या उपचार घेत आहे. ऑक्सिजन पातळी कमी असणारे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. नगर शहरात टंचाई निर्माण झाल्यानंतर आता संगमनेर तालुक्यात कमतरता भासत आहे. तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे, यामुळे संगमनेर शहर व तालुक्यातील डॉक्टरांकडून चिंता व्यक्त होत आहे. ऑक्सिजन लवकर प्राप्त नाही झाला तर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांत चिंता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रशासनाच्या संपर्कात आल्याची माहिती समजते. प्रशासन लवकरात लवकर ऑक्सिजन उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Title: Lack of oxygen to Sangamner