Home अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांसोबत आता एसआरपी तैनात, विनाकारण बाहेर पडल्यास आता बसणार चोप

जिल्ह्यात पोलिसांसोबत आता एसआरपी तैनात, विनाकारण बाहेर पडल्यास आता बसणार चोप

SRP is now deployed with police in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: संपूर्ण राज्यात आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. शासनाने आंतरजिल्हा बंदी घातली असून लग्नासाठी केवळ २५ लोकांची उपस्थिती व २ तासांची मर्यादा यासंह विविध निर्बंध घातले असून जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन अंमलबजावणी केली जाणार आहे.

विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला एसआर पी तैनात करण्यात आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांत हे जवान तैनात राहणार आहे. विनाकारण बाहेर पडल्यास त्यांना दंडात्मक कारवाईसह काठीचा प्रसाद खावा लागणार आहे.

पोलिसांच्या मदतीला एसआरपीची एक तुकडी मदतीला आली आहे. या तुकडीत ९९ जवान आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात पोलिसांच्या मदतीला त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता खोटे कारण सांगून बाहेर पडणाऱ्यांना काठीचा प्रसाद खावा लागणार आहे. अत्यावश्यक कारण सोडता घरातच बसा, विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन पोलीस प्रश्सानाकडून करण्यात आले आहे.  

Web Title: SRP is now deployed with police in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here