Home अकोले अकोले: मतीमंद मुलीवर अत्याचार आरोपीस मुंबईतून अटक

अकोले: मतीमंद मुलीवर अत्याचार आरोपीस मुंबईतून अटक

अकोले: घरी कुणी नसल्याचे संधी शोधत वाशेरे परिसरात एका अल्पवयीन मतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी वसई ता. पालघर येथून अटक केली. रमेश हरिभाऊ निबांळकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आई वडील मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर पिडीत मुलगी एकटीच घरी राहत असे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या दुध संघावर  मुबई येथून दुध भरण्यासाठी टंकर चालक व मुलीच्या वडिलांची ओळख झाली. टंकर भरेपर्यंत जेवण करण्यासाठी व विश्रांतीसाठी आरोपी पिडीत मुलीच्या घरी येत असे. एक दिवस पिडीतेचे आई वडील नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने सदर मुलीस त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मुलीच्या वडिलानी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक दीपक ढोमणे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. ढोमणे यांनी तज्ञ शिक्षकांच्या मदतीने पिडीत मुलीचा जबाब घेत आरोपीविषयी माहिती काढली. त्यांनतर वसई येथे अटक केली.


जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Latest News Accused accused of molesting girl 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here