Home अहमदनगर अहमदनगर: त्या करोनाबाधीताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह,  ७ जणांचे निगेटिव्ह अहवाल

अहमदनगर: त्या करोनाबाधीताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह,  ७ जणांचे निगेटिव्ह अहवाल

अहमदनगर: पुणे येथील लष्करी महाविद्यालयाकडून आज सात व्यक्तींचे नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका करोनाबधीताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४३ करोनाग्रस्त आहेत. त्यापैकी २४ जण बरे झाले आहेत. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जणांवर उपचार सुरु आहेत त्यापैकी आलमगीर येथील एका करोनाबाधीताचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आता फक्त १६ जणांवरच उपचार सुरु आहेत.

दरम्यान मागील गेल्या तीन दिवसांपासून एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या एकही रुग्ण आढळून न आल्याने ३ मे नंतर लॉकडाऊन खुला होईल अशी आशा बळावली आहे.  

Website Title: Latest News Ahmednagar corona report nil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here