Home अकोले अकोले: त्या दिवट्याच धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवार

अकोले: त्या दिवट्याच धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवार

अकोले: राष्ट्रवादीने अकोले तालुक्याला भरभरून दिले. निळवंडे धरण पूर्णत्वास नेले. पाण्याचे प्रश्न सोडविले. पिंपळगाव खांड धरण पूर्ण केले. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद व जिल्हा परिषदेत महत्वाचे खाते दिले. परंतु दिवट्याने काळा चष्मा काढला. आणि त्याची काळी बाजू दिसू लागल्याने त्याने पक्ष सोडला त्यांचे धोतर फेडायला वेळ लागणार नाही असा इशारा अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे पिचड यांना दिला.

अकोले बाजारतळावर सभा झाली त्यावेळेस ते बोलत होते. स्वतः च्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी पक्ष बदलला मात्र अकोल्याची जनता हि राष्ट्रवादीबरोबरच आहे. तालुक्यात आघाडी सरकारने बरीच कामे केली. राज्यात पुन्हा सत्ता येताच सातबारा कोरा करू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

तालुक्यात आरोग्य, शिक्षण सुविधा नाही याबाबत खंत व्यक्त केली. नेतृत्वाने फक्त स्वतः ची तुंबडी भरली. भाजपची मस्ती जिरविण्यासाठी युवकांनी कंबर कसावी. भाजपच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन पवार यांनी केले.

Website Title: Latest News Ajit Pawar in Akole sabha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here