Home अकोले अकोले: भाजपचा आपल्याला पराभव करायचा आहे: अजित पवार

अकोले: भाजपचा आपल्याला पराभव करायचा आहे: अजित पवार

अकोले (प्रतिनिधी) :– ज्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत. राघोजी भांगरे यांनी विनम्र अभिवादन,  देवदेवतांची स्वागत करण्याची परंपरा आहे. पण, उद्याच्या काळात लोकशाहीच्या उत्सवाची परंपरा आहे.  त्यात भाजपचा आपल्याला पराभव करायचा आहे. अकोल्यात आल्यावर माझ्या परिने येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. भंडारदरा व निळवंडे यांचे काम करण्याचे अश्वासन दिले. पण, याचे काम खऱ्या अर्थाने आपण केला आहे. मला तुम्ही उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेले. या परिसरातील पिपळगाव खांडचे काम नियमात बसत नव्हते ते खाजगी बाबीतून पुर्ण केले.

अंबित वैगरे ही कामे आपण केली. अधिकारी म्हणत होेते. नियमात बसत नाही. मी म्हटलं कसे बसत नाही. बसवायचे आहे. हे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही केले. या वयात पवार साहेब जनतेसाठी काम करतात. तरुण व महिलांसाठी आपल्याला संधी द्यायची आहे. आज ज्यांनी पक्ष बदलला त्यांना साहेबांनी काय कमी केले. मंत्रीपदे, स्थानिक स्वराज्य संस्था, विरोधी पक्षनेतेपद दिले. नगरजिल्हा बँकेचे अध्यक्षपद तुम्हाला दिले. पवार साहेबांनी काय कमी केेले. केवळ बळ देण्यासाठी. तरी पवार साहेबांना दगा देण्याचे काम यांनी केले. मात्र, याला तोंड द्यायला तुम्ही स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या. एकास एक उमेदवार द्यायचा. ते कायम ठेवा. तुम्हाला अमिष दिले जाईल. कारण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जर माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ज्या गावच्या बोरी आहेत. त्याच गावच्या बाभळी आहेत. हे विसरु नका. काही दिवसांपुर्वी ते म्हणाले आम्ही काळा चष्मा काढला तेव्हा सत्य समोर आले. वा रे दिवट्या. ४० वर्षे सत्ता दिली. काय केले. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या भागात कारखानदारी ही ३३ शे टनाने दिला आहे. संस्था चालवायच्या असतात. लुटायच्या नसतात. स्वत:च्या तुंबड्या भरायच्या नसतात.

त्यामुळे उद्याच्या काळात परिवर्तन हवे आहे. गाफील राहु नका. हलक्या कानाचे राहु नका. तुमच्यातच काही गुप्तहेर सोडले जातीत. त्यांचे काही एकू नका. आम्ही मंत्रालयात होतो तर जनतेची कामे सुटत होती. आता, त्याच मंत्रालयात लोक आत्महत्या करू लागले आहेत. १६ शे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आया बहिनींचे कुंकू पुसले. रोजगार, पोलीस भरती, कारखाने, एमआयडीसी हे प्रश्न सुटायला तयार नाही. भिमा कोरेगाव, दाभोळकर हत्याकांड, दाभोळकर यामागचे मास्टरमाईंड काेण ? हे प्रश्न सुटत नाही. हे सरकार पूर्णपणे अपयशी असल्याची टीका त्यांनी केली. 

Website Title: Latest News NCP AJIT PAWAR in Akole 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here