Home अकोले अकोले: संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट भाव मागणीसाठी पुन्हा आंदोलन: डॉ. अजित नवले

अकोले: संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट भाव मागणीसाठी पुन्हा आंदोलन: डॉ. अजित नवले

अकोले: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच शेतकर्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी येत्या २ ऑक्टोबर पासून अर्थात महात्मा गांधी जयंतीपासून पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिली.

मुंबईत गेल्या नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या विराट शेतकरी मोर्चाने सत्त्ताधारी हादरले होते. त्यानंतर आता विनाअट सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालाला दीडपट भाव या प्रमुख मागण्या घेऊन निवडणुकीच्या धामधुकीत शेतकर्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचा निराधार केला आहे. या आंदोलनागत प्रत्येक गावाच्या चावडीवर मी शेतकरी या बॅनर खाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गावात एकदा राजकीय पक्ष निवडणूक प्रचार सभा घेत असल्यास त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत लेखी हमी घेतली जाणार आहे. शेतकर्याच्या दोन्ही प्रमुख मागण्याबाबत कायदा करण्याची हमी दिली तरच संबंधीत पक्षाला गावात सभा घेण्याची परवानगी दिली जाईल असेही निश्चित करण्यात आले आहे. अशी सभा झाल्यास मी शेतकरी लिहिलेली टोपी घालून शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. याविषयी राज्यभर शेतकरी परिषदा घेऊन कर्जमुक्ती व हमीभावाचे ठराव करून ते राज्यापाल यांना पाठविण्यात येतील असेही सुकाणू समितीने सांगितले.

Website Title: Latest News demand for complete debt relief and 1.5 times Andolan 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here