Home अकोले राजूर: अ.नगर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सर्वोदयच्या विद्यार्थ्यांना सुयश

राजूर: अ.नगर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सर्वोदयच्या विद्यार्थ्यांना सुयश

राजूर: अहमदनगर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा नुकत्याच वाडिया पार्क, क्रीडा संकुल, अहमदनगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा वि पाटणकर सर्वोदय विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले. यामध्ये 14 वर्षखाखालील मुलांमध्ये दिपक मुठे 100 मी व 200 मी फ्री स्टाईल  प्रथम कृष्णा बनकर 100 मी व 200 मी द्वितीय राघव धराडे 100 मी व 200 मी बॅक स्ट्रोक प्रथम 50 मी प्रथम 17 वर्षखालील मुले गटात उध्दव लहामगे 50 मी फ्री स्टाईल द्वितीय 19 वर्षाखालील गटात यश मैड 50 मी, 100 मी द्वितीय तर 200 मी प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक संतोष बनकर, प्रा विनोद तारू, श्री भारत भोसले, श्री जालिंदर आरोटे, श्री भाऊसाहेब बनकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.  कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी,  प्राचार्य एम.डी. लेंडे उपप्राचार्य एल.पी. पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Website Title: Latest News SVM Students district level swimming competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here