Home अकोले अकोले ते राजूर खड्डेमय रस्त्यामुळे नागरीक त्रस्त: प्रशासनाचे दुर्लक्ष

अकोले ते राजूर खड्डेमय रस्त्यामुळे नागरीक त्रस्त: प्रशासनाचे दुर्लक्ष

अकोले ते राजूर खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त

अकोले: कोल्हार घोटी राज्य मार्गावरील रस्त्यांचे बारी ते राजुरपर्यंतचे काम सुरू असताना राजुर ते अकोले हद्दीपर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या महिनाभरपासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत धिम्या गतीने व नित्कृष्ट होत असल्याने शहरात पंधरा दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे आता पुन्हा उखडल्याने रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र दिसत आहे.

नवनिर्वाचित आ. डॉ. किरण लहामटे यांनी यात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम व संबंधित अधिकार्‍यांना खडसावून काम चांगल्या प्रतीचे करा. अकोले संगमनेर राजूर रस्त्यावरील खड्डे प्रथम बुजविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

मात्र अजूनही अकोले ते राजूर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात प्रशासनाला यश आले नाही. काम नुसते चालू आहे परंतु त्यात गतीमानता दिसून येत नाही. अत्यंत धिम्या गतीने हे काम सुरू आहे. त्याचबरोबर पंधरा दिवसांपूर्वीचे काम पुर्णपणे उखडत असल्याने रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हुलकावणीच्या नादात वाहनचालकांकडून छोटे मोठे अपघात होत आहे.

रस्त्यांचे काम अत्यंत धिम्या गतीने व नित्कृष्ट प्रतीचे असल्याकरणामुळे प्रवाशी, स्थानिक, नोकरदार व नागरिक यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.अकोले राजूर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी होत आहे. 

Website Title: Latest News Akole Rajur Road Demand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here