Home अकोले अकोल्यात ग्रामसेवकावर ९४ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा

अकोल्यात ग्रामसेवकावर ९४ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा

अकोले: तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल असतानाच शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर गहाळ करून ९४ लाख १७ हजार ६९२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निलंबित ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग यांनी गहाळ करून सुमारे ९४ लाख १७ हजार ६९२ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

अकोले तालुक्यातील शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार नोव्हेंबर २०१३ ते मे २०१८ या काळात ग्रामसेवक भाऊसाहेब रणशिंग यांनी स्वीकारून गावाच्या कारभाराला ग्रामपंचायत स्तरावर सुरुवात केली. परंतु शेणीत व आंबेवंगण ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना त्यांच्या ताब्यातील ग्रामनिधी व चौदावा वित्त आयोग, पेसा ग्रामसभा कोषनिधी , पाणी पुरवठा निधी या खात्यावरील एकूण ९४ लाख १७ हजार ६९२ रुपये रक्कम व अंदाजपत्रके तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून सदरचे दप्तर गहाळ करत मोठा अपहार केला आहे.

अपहार केल्याचे बँक स्टेटमेंटप्रमाणे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराची व दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. ग्रामपंचायत दप्तर स्वतःच्या ताब्यात स्वाधिकारात ठेवली आहे. ते ग्रामपंचायत कार्यालयात ठेवणे बंधनकारक असतानाही ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले नाही. त्यामुळे तपासणी करता आलेली नाही. असे अपहार केल्याचे दिसून येत असल्याची फिर्यादी अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे रा. संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिली. त्यावरून राजूर पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब रणशिंग यांच्या विरोधात भा. द.वि. कलम ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नितीन खैरनार हे करीत आहे.

Website Title: Latest News Rural crime worth Rs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here