Home Uncategorized अकोले: उसाच्या बैलगाडीखाली आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अकोले: उसाच्या बैलगाडीखाली आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अकोले: उस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीखाली सापडून आंबड ता. अकोले येथील शेतकरी शिवराम रामचंद्र जाधव वय ६५ याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास अकोलेतील कारखाना चौकात हा अपघात घडला.

गुरुवारी अकोलेचा आठवडा बाजार असल्याने वाहनांची वर्दळ होती. यातच उस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांमुळे कारखाना चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. बँकेचे काम आटोपून जाधव बसस्थानकाकडे जात असताना अचानक समोरून येणारी टायरगाडी बैलांना न आवरल्याने त्यांच्या अंगावर आली. ते टोल जाऊन रस्त्यावर पडले. याच दरम्यान बैलगाडीचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. नागरिकांनी तातडीने त्यांना संगमनेरमध्ये उपचारासाठी आणले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जाधव परिवाराची परिस्थिती हलाखीची असल्याने अगस्ती कारखाना प्रशासनाने तातडीने दाखल घेत या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची व बाजाराच्या दिवशी उसवाहतूक बैलगाडी बंद ठेवण्याची मागणी होत आहे.

Website Title: Latest News Accident ambad farmer death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here