Home अकोले डोंगरगाव ग्रामपंचायतीने केली निर्जंतुकाची फवारणी, लाऊडस्पीकरने जनजागृती

डोंगरगाव ग्रामपंचायतीने केली निर्जंतुकाची फवारणी, लाऊडस्पीकरने जनजागृती

डोंगरगाव (अशोक उगले): अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे देशातील नागरिकांची सुरक्षा म्हणून सरकार सर्वतोपरी उपाय योजना करत आहे त्याचाच एक भाग म्हणून डोंगरगाव ग्रामपंचायत ने हायड्रोक्लोराइड ची संपूर्ण गावात व पूर्ण गावचा शिवार, वाड्या वस्त्यांवर ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी केली आहे, त्यामुळे नागरिकात दिलासादायक वातावरण आहे.
तसेच ग्रामपंचायतच्या वतीने लाऊडस्पीकर च्या साह्याने नागरिकांना कोरोना विषाणू विषयी जनजागृती केली आहे नागरिकांनी सोशल डिस्टनशिंग राखावे यासाठी खबरदारी घेतली जात आहे गावकऱ्यांचे कोरोना प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे गावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब उगले यांनी सांगितले.
या वेळी सरपंच बाबासाहेब उगले, मा उपसरपंच अशोक उगले ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम, आर के उगले,ग्रामसेवक बजरंग चौधरी, डॉ संतोष उगले, ग्रामपंचायत कर्मचारी कलर्क बाळासाहेब उगले, लखन माळी, संजय कदम, सुनिल कदम, यांनी ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी व जन जागृती केली.
वाचा: sangamner News
Website Title: Latest News Dongargaon Gram Panchayat, loudspeaker awareness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here