Home अकोले पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार गणेश रेवगडे यांना जाहीर

पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार गणेश रेवगडे यांना जाहीर

कळस : अकोले तालुक्यातील कळस बु येथील लोकमत व सार्वमत वुत्तसमुहाचे ग्रामीण पत्रकार गणेश रेवगडे यांना सन २०२० या वर्षाचा ध्येय्य उद्योग समुहाच्या वतीने दिला जानारा पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
    अकोले तालुक्यातील राजकीय,सामाजिक,आध्यात्मिक,शिक्षण व समाज्यातील वंचित प्रश्नांना आपल्या धारधार शब्द रचनेतुन न्याय मिळवुन देण्यासाठी वयाच्या २१ व्या वर्षातच ज्यांनी पत्रकारीतेचे क्षेत्र स्विकारून तरूण पत्रकार म्हणुन समाजात पत्रकारिता चा चौथा स्तंभ जाग्रुत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी ध्येय समुहाच्या वतीने अध्यक्ष लहानु सदगीर यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले आहे. गणेश रेवगडे हे पत्रकारीते बरोबर कळस खुर्द सहकारी सोसायटीचे मुख्य सचिव व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख म्हणुन सुध्दा जबाबदारी पार पाडतात.
 पत्रकारांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या बाजु समजुन पत्रकारांना प्रोत्साहित करूण त्यांचा सन्मान करण ध्येय उद्योग समुहाचे कर्तव्य आहे असे यावेळी सदगीर यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळा दि.१५ मार्च रोजी अहमदनगर येथील माऊली लाँन्स येथे राज्यातील मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे..या पुरस्काराच्या निमित्ताने जि.प.चे मा.अर्थ बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे व अगस्ती कारखान्याचे संचालक सुरेश गडाख  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व कळस व तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Website Title: News Ganesh Revgade announces the state level award

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here