Home अकोले पराभवाची कारणे शोधणार: जनतेचा कौल स्वीकारला: वैभव पिचड

पराभवाची कारणे शोधणार: जनतेचा कौल स्वीकारला: वैभव पिचड

अकोले: पराभव अनपेक्षित आहे विजयाची खातरी होती परंतु जनतेने दिलेला निकाल हा मी खुल्या दिलाने स्वीकारतो. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी मतदार संघाची फेरी काढून आपण त्यांची विश्लेषण करून असे महायुतीचे पराभूत उमेदवार व माजी आमदार वैभव पिचड यांनी पत्रकारांना सांगितले. विशेष बाब म्हणजे वैभव पिचड मत मोजणी सुरु झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत मतदान मोजणीच्या ठिकाणी बसून होते,त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी यशवंत आभाळे होते. निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपू शकले नाहीत.मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलणे पसंत केले. ते म्हणाले कि पक्ष बदलण्याचा परिणाम आपल्याला मान्य नाही. श्रीगोंदा पॅटर्न आणि आणखी कोणता पॅटर्न पराभव करून गेला ते पाहावे लागेल. त्यामुळे आपला पराभव झाला का?  यांची कारणीमीमांसा शोधावे लागेल यापुढे आणखी काही अडचणी निर्माण होतील काय? राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालूच राहील पण पराभव पाहणे व शोधणे हे उचित ठरले असे ते म्हणाले .

या निमित्ताने त्यांनी पवार कुटुंबाचे नाव न घेता काही काहीना जिल्हा सहकारी बँकच्या पदाचे आश्वासन दिले गेले आहे. काहींना विधानपरिषदेचे आश्वासन दिले गेले आहे. आणि आणखी अन्य काही आश्वासने दिले गेल्यामुळे आपला पराभव झाला. त्याचा हातभार लागला. विरोधकांची त्यामुळे एकजूट झाली असेल अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत जनतेने आपल्याला व वडिलांना जे पाठबळ दिले त्याबद्दल आणि आताही ज्या मतदारांनी मतदान केले त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्याबाबत निश्चितपणाने कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानतो. असे स्पष्ट करून त्यांनी नवीन आमदारांना शुभेच्चा दिल्या.आणि त्यांची कारकीर्द चांगली व्हावी त्यांना कारकीर्दीच्या शुभेच्चा देताना आपण विकासकामांना यापुढेही साद घालू असे यावेळेस पत्रकारांना सांगितले.

आपल्या पूर्वीच्या पक्षातील घड्याळ चिन्हाचा वापर आपल्या विरोधात केला काय आणि त्यामुळे आपला पराभव झाला काय आम्ही कुठे कमी पडलो ते पाहावे लागेल.  

Website Title: Latest News Finding reasons for defeat Vaibhav Pichad 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here