Home अकोले स्वच्छता दूत यांचा सन्मान करून एलआयसीने सामाजिक भान जपले: अमोल वैद्य

स्वच्छता दूत यांचा सन्मान करून एलआयसीने सामाजिक भान जपले: अमोल वैद्य

अकोले (प्रतिनिधी): समाजासाठी सातत्याने स्वच्छतेचे दूत म्हणून काम करणाऱ्या सामान्य माणसांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करून एलआयसीने आपली सामाजिक भान जपले असल्याचे प्रतिपादन अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले . 
एलआयसी चे विकास अधिकारी श्रीनिवास वाणी यांनी  विमा सप्ताह व विमा  प्रतिनिधी दिनाचे निमित्ताने त्यांच्या अकोले येथील सिनियर बीझनेस असोसिएट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात  अध्यक्षपदावरून  ते बोलत होते. कार्यक्रमास अकोले आगाराचे व्यवस्थापक  ज्ञानेश्वर आव्हाड, भारतीय आयुर्विमा मंडळाचे संगमनेरचे शाखाधिकारी भारत दिवे, अकोल्याचे विकास अधिकारी श्रीनिवास वाणी, 73 94 टीम व स्वच्छता दूत आदी  उपस्थित होते.
वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की ,आजारांमध्ये स्वच्छतेचे काम करणारे ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचे काम करणारे ही माणसे समाज कार्य करीत आहेत. प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या माणसांमुळे अवतीभोवतीच्या समाजाला अधिक उत्तम जीवन जगता येते आहे. स्वतः कठीण स्तरावरती जीवन कंठत इतरांसाठी राबणारे हात हे प्रेरणादायी आहेत .ही माणसे कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत असतात .त्यामुळे या माणसांकडून होणाऱ्या कामाची दखल एलआयसीने घेऊन आपले सामाजिक दायित्व निभावले आहे.
अकोले आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड आपल्या मनोगतात म्हणाले की, एलआयसीने समाजाचा आजवर विश्वास संपादन केला आहे. तो कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांवरती आहे. विमा प्रतिनिधी मध्ये ज्ञान आणि संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
एलआयसीचे शाखाधिकारी भारत दिवे यांनी
एलआयसीने जगभर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एलआयसीची मालमत्ता 31. 1 1 लाख कोटी असून 28 लाख कोटी फंड बाजूला ठेवला आहे साडेतीन लाख कोटीरुपये नवीन प्रीमियम एलआयसी कडे आला आहे बारा लाख विमा प्रतिनिधी एलआयसी अंतर्गत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे स्वच्छता दूत रामचंद्र गायकवाड गायकवाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
प्रास्ताविक व स्वागत एलआयसीचे विकास अधिकारी व सिनियर बिझनेस असोसिएट श्रीनिवास वाणी यांनी केले. एलआयसी विमा सप्ताह निमित्ताने विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून अकोले ग्रामीण रुग्णालय व अकोले आगार मधील स्वच्छता  दूत यांचा सत्कार  करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Website Title: Latest News LIC Social Work Amol Vaidya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here