Home अकोले भंडारदरा/ निळवंडे धरणातून १७ जूलै पासून पिण्याचे आवर्तन

भंडारदरा/ निळवंडे धरणातून १७ जूलै पासून पिण्याचे आवर्तन

भंडारदरा: आजमितीस भंडारदरा धरणात ४७१४ दलघफू तर निळवंडे धरणात १७०६ दलघफू पाणीसाठा आहे. दोन्ही धरण मिळून १ जून पासून आजपर्यंत ५६२० दलघफू पाण्याची आवक झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जरी पाऊस होत असला तरी लाभक्षेत्रात जास्त पाऊस झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अकोले, संगमनेर, राहता तालुक्यातील नदीकाठील ग्रामपंचायतींची तसेच दोन्ही कालव्यावरून पाणी घेत असलेल्या ग्रामपंचायती आणि श्रीरामपूर नगरपालिका यांची पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाला करण्यात आली आहे.

 त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने निळवंडे धरणातून दिनांक १७/७/२०१९ रोजी सकाळी ६ वाजता पिण्यासाठी १५०० क्यूसेक न आवर्तन सोडण्यात येईल. हे आवर्तन ५ ते ६ दिवसांचे राहील. हे आवर्तन श्रीरामपूर पर्यंत असेल. या आवर्तनात साधारण ६०० ते ६५० दलघफू पाण्याचा वापर होईल. आवर्तन काळात ५ तास वीज पुरवठा सुरू राहील. या वर्षातील हे पहिले आवर्तन असेल. अशी माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मा. किरण देशमुख यांनी दिली.

Website Title: Latest News: Rotation Of Drinking From Bhandardara / Nilvande Dam On 17th July

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here