Home अकोले राजूर: सर्वोदयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला.

राजूर: सर्वोदयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला.

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा, वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर भारतरत्न डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून सहभाग घेतला होता. यात विद्यार्थी प्राचार्य दर्शन लहामगे, उपप्राचार्य ओंकार कानकाटे, पूर्वा अवसरकर यांनी महत्वाची कामगिरी केली. सर्व विद्यार्थ्यांनी या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गणपती उत्सवानिमित्त सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे व सौ. कानवडे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन एस.एस.पाबळकर, आर.आर. मढवई, सौ. बिना सावंत यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बी.एन.ताजणे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उप प्राचार्य एल.पी. पर्बत यांनी केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी पायल बेनके हिने केले तर शुभम दांडे या विद्यार्थ्याने सर्वांचे आभार मानले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी व्ही.टी.तारू, संतराम बारवकर, अजित गुंजाळ, अमोल तळेकर, स्मिता हासे, अविज्ञा चासकर, गीतांजली उंबरकर, सौ. ए.डी. देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.SVm Teacher Day

Website Title: Latest News SVM RAJUR Teacher day Celebration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here