Home अहमदनगर ‘राज्यसभा घ्या, शिर्डी द्या’, रामदास आठवलेंची महायुतीसमोर मागणी

‘राज्यसभा घ्या, शिर्डी द्या’, रामदास आठवलेंची महायुतीसमोर मागणी

Breaking News | Shirdi Loksabha Election : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा.

Loksabha Election Take Rajya Sabha, give Shirdi', Ramdas Athawale's demand 

अहमदनगर: खासदार सदाशिव लोखंडे माझे चांगले मित्र आहेत. माझी शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे खासदार लोखंडेंना माझे राज्यसभेचे उरलेली दोन वर्षे द्यावीत आणि मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्म्युला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीसमोर (BJP) ठेवला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी (ता. ५) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिर्डी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. आठवले म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर २००९ ला मी या ठिकाणी उमेदवार होतो. मात्र, माझा पराभव झाला. परंतु, पराभवामुळे माझी शिर्डीवर नाराजी नाही. मी लोकसभा निवडणूक लढवावी, ही जनतेची इच्छा आहे. शिर्डीच्या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी महायुतीसमोर नवा फॉर्म्युला ठेवला.

खासदार लोखंडेंना माझी राज्यसभेची उरलेली दोन वर्षे देऊन मला शिर्डीींची उमेदवारी द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली, तसेच मला शिर्डीमध्ये संधी मिळाली, तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री असताना मला चांगली संधी उपलब्ध होईल. नरेंद्र मोदी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, तर मी मंत्री होणारच आहे. माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेतकरी, दीनदलित, व्यापारी यांच्यासह शिर्डी संस्थानाला बळकट करण्यासाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Loksabha Election Take Rajya Sabha, give Shirdi’, Ramdas Athawale’s demand 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here