अकोले ब्रेकिंग! उद्या शनिवारी अकोले शहर व तालुका बंदची हाक
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका बंद पाळण्यात येणार (Manoj Jarange Patil).
अकोले: मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका बंद पाळण्यात येणार आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार मोरे यांच्याकडे निविदा देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाल) बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत खालावत आहे. तरी राज्य सरकार जरांगेंच्या जीवाची पर्वा करेना, हे पाहून मराठा समाज अधिक आक्रमक होऊ लागलाय. अहमदनगर जिल्ह्यात याचे पडसाद उमटत आहेत.
यामुळेच हे जनआंदोलनाची तीव्रता अधिक वाढवून पाठिबा देण्यासाठी व सरकारच्या वेळकाढू धोरणांचा धिक्कार व निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण अकोले तालुक्यातील सर्व गावांतून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शनिवारी अकोले शहरासह संपूर्ण तालुका कडकडीत बंद..बंद..बंद
याबाबत सर्व व्यावसायिक, दुकानदार व शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी अकोले तालुका बंद मध्ये सहभागी होऊन सकल मराठा समाज आरक्षणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात भागीदार व्हा..अकोले तालुका उद्या शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी कडकडीत बंद..कडकडीत बंद…
Web Title: Maratha Reservation Akole city and taluka bandh
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study